शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सुखद वार्ता : राज्यात ४८ तासांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता; १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:11 IST

तळ कोकणात ११ ते १३ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा

ठळक मुद्देपुण्यात १२ व १३ जूनला आगमन, मुंबईत मॉन्सून १३ जूनला येणारमंगळवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी पुढे केली वाटचाल१० जून रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचा परिणाम मॉन्सूनच्या पुढील वाटचालीवर होण्याची शक्यताअसून, येत्या ४८ तासांत गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागात मॉन्सूनचे आगमन होऊ शकते. तळ कोकणात ११ ते १३ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी पुढे वाटचाल केली.याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की,बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होईल. १० अथवा ११जून रोजी मॉन्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होणार आहे. त्यानंतर १४ अथवा १५जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात १२ किंवा १३ जून, मुंबईत १३ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १२ जूनपासून मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सूनच्या नव्या तारखांनुसार गोव्यात मॉन्सूनचे आगमन ५ जून रोजी आहे. यंदा त्याला थोडा उशीर झाला असून, संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून १५ जूनपर्यंत व्यापतो.

महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर तो वेगाने वाटचाल करणार असून, १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. राज्यात १२जूनपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होण्याची शक्यता असून, पुणे जिल्हा वनाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या १४ तासांत कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.मालवण ५६, रत्नागिरी ४९, गगनबावडा ३६, चंदगड, महाबळेश्वर ६ मिमी पाऊस पडला.

इशारा : १० जून रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.१२ जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १३ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.........११, १२ व १३ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १२जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, पुणे, बीड, हिंगोलीतजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामान