Good news! The death rate of corona patients in India is very low as compared to other countries | चांगली बातमी ! इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी

चांगली बातमी ! इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी

घरात राहा, सुरक्षित रहा आणि विशेष म्हणजे कोरोनाला घाबरू नका तो बरा होतो. अशात अनेकांनी कोरोनावर मात करत बरे होत घरी परते आहेत. जे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचले त्यांच्यासाठी कोरोना हा घातक ठरला . भारतात तर ९९ वर्षाच्या आजीपासून ते अवघ्या १० दिवसाच्या बाळाने देखील कोरोनावर मात करत सुखरूप घरी परतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशात आता देशवासियांसाठी आणखीन एकदिलासादायक बातमी आहे. सुरुवातीला मृत्युदर जास्त असले तरी आता तो कमी झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत भारत जरी ९ व्या स्थानावर असला तरी बरे होणारी रुग्णसंख्यादेखील मोठी आहे. आतापर्यंत देशभरात 82370 रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. 

भारतात आता बरे होणा-या रूग्णांचा  दर 47.40 वर पोहोचला आहे. 18 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा हा आकडा 38% पर्यंत पोहोचला. आणि आता तो 47 टक्के पोहोचला. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यावरून आगामी काळात आणखी खबदारी घेत कोरोनाचे संक्रमण रोखण्यास प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊन देखील काही प्रमाणात उठवण्यात जरी आले तरीही काही नियमांनुसारच नागरिकांना जगावे लागणार आहे. स्वतःची योग्य काळजी घेत कोरोनापासून लांब राहावे लागेल.त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा विविध गोष्टी करत संक्रमण रोखण्यास मदत होईल. 

त्यामुळे अपनी सुरक्षा अपने हाथ हाच पवित्रा सा-यांनी आत्मसात केल्यास लवकरच भारतदेखील कोरोनामुक्त देश होईल हे मात्र नक्की.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good news! The death rate of corona patients in India is very low as compared to other countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.