भाजपात महिलांसाठी अच्छे दिन
By Admin | Updated: August 12, 2014 03:17 IST2014-08-12T03:17:47+5:302014-08-12T03:17:47+5:30
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १६ ते २० महिलांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

भाजपात महिलांसाठी अच्छे दिन
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १६ ते २० महिलांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देण्याची शक्यता आहे. १६ नावे पक्षाच्या यंत्रेणेने शोधली असून, ती यादी खुद्द अध्यक्ष अमित शहा यांच्या हाती असल्याचे सूत्राने सांगितले. यातील काही महिला आमदार असून, काही माजी महापौर तर काही नगरसेविका आहेत.
गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांना आमदारकी द्यावी, हा यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी किमान एका जागेवर महिला उमेदवार असावा, असाही एक विचार पुढे आला आहे.
राजधानीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेनंतर शहा यांनी १६जागांवरील नावे ठरविली असून, भाजपा- शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा मिटला तर अनेक नव्या महिलांना संधी मिळू शकते. सध्या काही सुरक्षित जागांवर पक्षातील नेत्यांनी नव्याने फेर धरल्याने त्यांना बदलून किंवा नव्या मतदारसंघात महिलांची वर्णी लावण्यात येईल असहीे सूत्राचे म्हणणे आहे.
विधानसभेची उमेदवारी देताना महिलांना फार महत्त्व दिले जात नसल्याचे पक्षाला दिसून आल्याने पक्षातील काही महत्त्वाच्या नावावर पक्ष विचार करत असल्याचे सांगण्यात आले. या घडामोडीला अंतिम रूप २५ तारखेच्या पुढे येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
पंकजा मुंडे (परळी), देवयानी फरांदे (पंचवटी), नीता केळकर (सांगली), माधुरी मिसाळ (पर्वती), स्मीता वाघ (अमळनेर), अर्चना डेहनकर (नागपूर), निवेदिता चौधरी (तिवसा), विजया राहाटकर (औरंगाबाद), मुक्ता टिळक (कसबा), मनीषा चौधरी (बोरीवली) शायना एन.सी (कुलाबा), मेधा सोमय्या (मुलूंड), मंदा म्हात्रे (बेलापूर), सीमा हिरे (नाशिक), मंजुळा गावित (नंदुरबार), सुमन गावंडे (अकोला) यांची नावे पक्षाने एका सर्व्हेच्या माध्यमातून शोेधली आहेत.
म्हात्रे या अलीकडेच राष्ट्रवादीतून पक्षात आल्याने त्यांचे नाव फार तग धरत नाही. तथापि, पक्षातील कामाचा अनुभव लक्षात घेता यातील अनेकींना उमेदवारी दिला जाणार आहे.