शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'देश में अच्छे दिन आ गए हैं' : भाजपा अध्यक्ष अमित शहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 07:25 IST

आमच्या पार्टीने अच्छे दिन येतील असं सांगितलं होतं, अच्छे दिन आले आहेत असं भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत.

ठळक मुद्देआमच्या पार्टीने अच्छे दिन येतील असं सांगितलं होतं, अच्छे दिन आले आहेत जनादेशापेक्षा मोठं प्रमाणपत्र कोणतंही नाही

भुवनेश्वर, दि. 8 -  आमच्या पार्टीने अच्छे दिन येतील असं सांगितलं होतं, अच्छे दिन आले आहेत असं भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. ''2014 पासून अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला जनादेश दिला, या वरून देशाच्या झपाट्याने होणा-या विकासाची लोकांच्या मनावर छाप पडली असल्याचं दिसतं'' असं ते म्हणाले.

''अच्छे दिन आले आहेत, अनेक जण त्याचा अनुभव घेत आहेत. 2014 पासून भाजपाला अनेक राज्यांमध्ये मोठा जनादेश मिळाला आणि विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला. जनादेशापेक्षा मोठं प्रमाणपत्र कोणतंही नाही. उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,जम्मू-काश्मीर,गोवा,मणिपूर,आसाम,हरियाणा,झारखंडचे विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे लोक अच्छे दिनचा अनुभव घेत असल्याचं स्पष्ट होतं.'' असं अमित शहा म्हणाले. ओडिसाच्या तीन दिवसाच्या दौ-यावर असलेले अमित शहा एका कार्यक्रमात बोलत होते. 

''वन रॅंक वन पेन्शन योजना,मुद्रा बॅंक, शौचालय, उज्ज्वला योजनेच्या फायद्यामुळे कोट्वधी लोक अच्छे दिनचा अनुभव घेत आहेत. सातव्या वेतन आयोगामुळेही अनेक जणांना फायदा झाला आहे. प्रभावीपणे नियंत्रित केलेल्या महागाईने अनेकांदा दिलासा मिळाल्यामुळे अच्छे दिनचा अनुभव लोकांनी घेतला आहे'' असं शहा म्हणाले. 

अमित शहा झाले लेखक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजता पुण्यात होत आहे.बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल. पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही आवृत्त्यांचे प्रकाशन शहा यांच्याच हस्ते होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित केले असून, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी, हे या पुस्तकाचे नाव आहे. त्यात भाजपाच्या धोरणाची चिकित्सा केली असून, कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावित या हेतूने शाह यांनी पुस्तकाचे लेखन केले असल्याची माहिती दिली. प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी असतील. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असतील. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व निमंत्रक योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.   

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा