नाल्यावरील इमारतींच्या कराराचे गौडबंगाल

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:27+5:302015-02-20T01:10:27+5:30

नाल्यावरील इमारतींच्या कराराचे गौडबंगाल

Gondbangal of the contract on the Nallah | नाल्यावरील इमारतींच्या कराराचे गौडबंगाल

नाल्यावरील इमारतींच्या कराराचे गौडबंगाल

ल्यावरील इमारतींच्या कराराचे गौडबंगाल
छाननी : सी. ए., विधिज्ञांच्या नेमणुकीचा मनपा आयुक्तांचा प्रस्ताव
औरंगाबाद : महापालिका हद्दीतील नाल्यांवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतींच्या कराराचे मोठे गौडबंगाल निर्माण झाले आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आणि कुठे कराराचा भंग झाला असेल तर जागा परत घेण्यासाठी सी. ए., विधिज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
नाला व नालेतर जागांवर इमारती आहेत. त्या जागांसाठी झालेले भाडेकरार, मनपाचे उत्पन्न, भाडे वाढविणे, कराराचा भंग झाला आहे का, या बाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सुशिक्षित कर्मचार्‍यांची गरज आहे. खाजगी सी. ए. व विधिज्ञांची नेमणूक करणे योग्य राहील. यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. २० फेबु्रवारीच्या सभेसमोर मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व मालमत्तांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ५, ३० आणि ९९ वर्षांचे करार मनपाने केलेले आहेत. अनेक ठिकाणच्या जागांचा भाडेकरार संपला आहे. तर काही इमारतींचा प्रीमिअम मनपाकडे आलेला नसताना त्यांचा वापर सुरू आहे. नवीन शीघ्रगणक दर (आर.आर.रेट) नुसार या ४२ ठिकाणी नव्याने भाडे घेणे अथवा जागा ताब्यात घेण्यासाठी मनपा सरसावणार आहे.
शिवाई ट्रस्ट, औषधी भवनसह ४२ जागा
औरंगपुर्‍यातील शिवसेनाप्रणीत शिवाई ट्रस्टच्या इमारतींसह दलालवाडीतील औषधी भवन, शिशुविकास महिला मंडळ, उस्मानपुरा, बॉम्बे मर्कन्टाईल बँक, जुनाबाजार, पीपल कॉ. ऑप. बँक, पे्रमचंद सुराणा, टिळकपथ, सारस्वत बँक, नागेश्वरवाडी, ज्योतीनगर डेव्ह., देशमुखनगर विकास संस्था, दशमेशनगर, सतीश लाहोट, उस्मानपुरा, रूपचंद गिरधारीलाल, उस्मानपुरा, लखा पहेलवान जिमखाना, जाधवाडी, चैतन्य गृहनिर्माण संस्था, गारखेडा, कुशीनारा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, जसवंतपुरा, समर्थ महिला मंडळ, समर्थनगर, डॉ.जावेद नवाज सब्जीमंडी, त्रिवेणी को.ऑप. हौ. सो., कटकटगेट, बिस्मिल्लाबी व इतर पाच सब्जीमंडी, मोहन बोंबले, समर्थनगर, मराठा सेवा मंडळ, टिळकपथ, बाईसाहेब प्रयागधाम ट्रस्ट, गोविंदनगर, जाहेद हसन खान, लोटा कारंजा, मिर्झा मुस्तफा बेग जाफरगेट, विवेकानंद कॉलेज, समर्थनगर, एस. एम. खान, रेल्वेस्टेशन, मधुकर येज्ञे, जाफरगेट, ढोकरजी, चेत्राम पुलवडे व राधाकिसन पिंपळे, चुडीबाजार, मुरलीधर गवळी, एस. बी. कॉलनी, पृथ्वीराज पवार सिद्धार्थ उद्यानामागे, समर्थ कृपा एस. जी. एन. संस्था, गारखेडा, सा.पोलीस टाइम्स, समर्थनगर, एम.एस.ई.बी. पन्नालालनगर, आनंदीबाई गादिया, बारुदगरनाला, जीवन कला मंडळ, समर्थनगर, राणी लक्ष्मीबाई महिला कल्याण मंडळ निजामुद्दीन दर्गा, मराठवाडा युथ बॉडी बिल्डर असो., समर्थनगर, सुरजितसिंगर खुंगर, उस्मानपुरा, सारंग सोसायटी, गारखेडा, संजय जोशी, मालजीपुरा, आर्म रेसलिंग असो., उस्मानपुरा याठिकाणच्या जागांचे करार मनपा तपासणार आहे.

Web Title: Gondbangal of the contract on the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.