शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

सोने वितळविण्याने भावनांनाच ठेच!

By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST

देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने मोठमोठे सुवर्णभंडार असलेल्या मंदिरावर नजर ठेवून ही योजना आखली असली तरी अनेक मंदिरांचे ट्रस्टी किंवा संचालकांनी सोने वितळविले जाणार असल्यामुळे धार्मिक भावनांना ठेच लागण्याचा मुद्दा उपस्थित करीत चिंता व्यक्त केली आहे.सरकारच्या सुवर्ण मौद्रिकरण योजनेत तत्काळ सहभाग नोंदविणे आमच्यासाठी कदाचित शक्य होणार नाही. ही योजना विचारात घेण्याजोगी असली तरी त्याबाबत अद्याप ठाम निर्णय घेतलेला नाही, असे काही मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. कुबेराचा खजिना मानले जाणारे केरळचे प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर, महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर आणि अन्य काही मंदिरांबाबत कनिष्ठ न्यायालयात चालत असलेले मुद्दे मार्गात अडसर बनले आहेत. सिद्धिविनायक मंदिराची तयारी...मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने या योजनेत रुची दाखविली आहे. या मंदिराकडे असलेले १६० किलो सोन्याच्या भंडाराचा उपयोग करण्याच्या विविध पर्यांयावर विचार केला जात आहे. या मंदिराने सुमारे १० किलो सोने याआधीच बँकेकडे जमा केले आहे. प्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या उच्चस्तरीय गुंतवणूक समितीने लवकरच बैठक आयोजित केली आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कनकदुर्गाम्मा मंदिराने सहभागी होण्यावर विचार केलेला नाही.गुजरातमधील प्रसिद्ध अंबाजी मंदिराने तूर्तास या योजनेत सोने जमा करण्यास नकार दिला असला तरी सोमनाथ मंदिराने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. अंतिम निर्णय मंदिरांचे विश्वस्त घेतील. द्वारकाधीश मंदिराच्या न्यास समितीचे अध्यक्ष एच.के. पटेल यांनी ही योजना विचार करण्यायोग्य असल्याचे स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)अनेक भाविक मंदिरांना देवी- देवतांच्या नावावर सोने भेट देतात. दान केलेले सोन्याचे दागिने किंवा विविध आभूषणे वितळविताना सोन्याचा ऱ्हास होऊन मूल्य कमी होत असल्यामुळेही अनेक देवस्थानांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण मौद्रिकरण योजनेनुसार धार्मिक संस्था, अनेक ट्रस्ट किंवा घरांघरांमध्ये पडून असलेले २२ हजार टन सोने आर्थिक प्रवाहात आणण्याचा उद्देश होता. आभूषणांच्या स्वरूपातील सोने जमा केले जात असले तरी बँकाकडून सोने वितळवूनच त्याची शुद्धता आणि मूल्य निश्चित केले जाते.