अल चोरट्याकडून सव्वा किलो सोने जप्त
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:39+5:302014-05-10T19:41:39+5:30
१७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३८ गुन्हे उघडकीस

अल चोरट्याकडून सव्वा किलो सोने जप्त
१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३८ गुन्हे उघडकीसअप्पर पोलीस अधीक्षक मकानदार यांची माहिती(फोटो)इचलकरंजी : पेन्शन बँकेत जमा झाली आहे, ती मिळवून देतो, अशी बतावणी करून वयोवृद्धांना फसवून त्यांची लुबाडणूक करून जिल्ात धुमाकूळ घालणार्या दस्तगीर गुलाब शेख (वय ३६, रा. सदर बाजार, कोल्हापूर) यास शिवाजीनगर पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली. कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ातील एकूण ३८ गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी या गुन्ातील ३० लाख रुपये किमतीचे सुमारे सव्वा किलो सोने जप्त केले आहे. फसवणुकीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची जिल्ातील ही पहिलीच घटना आहे. शिवाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश सावंत व मन्सूरअली जमादार या दोघांच्या अथक प्रयत्नांनंतर शेख याला गजाआड करण्यात यश आले.याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील व त्यांची पत्नी हे दोघेजण कर्हाड येथील नातेवाइकांकडे जाण्यासाठी ३ मे रोजी इचलकरंजीत आले होते. बसस्थानकात त्यांना गाठून दस्तगीर शेख याने पेन्शनच्या बहाण्याने रामगोंडा पाटील यांना मोटारसायकलवर बसवून स्टेशन रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ नेऊन सोडले व पुन्हा बसस्थानकात येऊन रामगोंडा पाटील यांच्या पत्नीस बॅँकेत सही लागणार आहे, दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करून त्यांच्याकडील दागिने लांबविले. या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल सावंत व जमादार हे दोघेही शेख याच्या पाळतीवर होते. घटना घडल्यानंतर दोन दिवस बनावट दागिने परिधान करून वृद्धांच्या मदतीने संबंधित चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही.त्यानंतर रामगोंडा पाटील यांना सोबत घेऊन फसवणूक करणार्याचा शोध घेण्यात येत होता. अखेरीस मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर एस.टी.तून उतरताना शेखला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपण केलेल्या गुन्ांचा पाढा वाचला. कोल्हापुरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, कुरुंदवाड, वडगाव, शिरोळ, मुरगूड, गांधीनगर, हुपरी, भुदरगड, कोडोली, कागल, करवीर, आजरा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, आदी विविध ठिकाणी ३८ हून अधिक फसवणुकीचे प्रकार केल्याचे त्याने सांगितले.फसवणुकीतून लंपास केलेले सुमारे ३० लाख रुपये किमतीचे एक किलो १२० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. शेख याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्याच्याकडून या गुन्ात वापरलेली मोटारसायकलही जप्त केल्याचे मकानदार यांनी सांगितले. शेख हा फळविक्रीचा व्यवसाय करीत होता. कोल्हापुरातून येऊन वृद्धांना गाठून त्यांना लुबाडण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेखने सोने वितळवून त्याच्या लड्या बनविल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात एखाद्या सराफाचा सहभाग आहे. शेख याच्याकडून पेन्शनच्या बतावणीखाली फसवणूक झालेल्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)(फोटो ओळी)दस्तगीर शेख याच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेले दागिने.