सोने-चांदी वधारले
By Admin | Updated: July 12, 2014 01:25 IST2014-07-12T01:25:39+5:302014-07-12T01:25:39+5:30
शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 48क् रुपयांनी वाढून प्रति दहाग्रॅम 28,68क् रुपयांच्या उच्चंकावर बंद झाला.

सोने-चांदी वधारले
नवी दिल्ली : शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 48क् रुपयांनी वाढून प्रति दहाग्रॅम 28,68क् रुपयांच्या उच्चंकावर बंद झाला. सोन्याच्या भावामध्ये एका दिवसात झालेली ही यंदाची दुसरी विक्रमी वाढ आहे.
चांदीचा भावही प्रतिकिलो 8क्क् रुपयांनी महाग होऊन 46,क्क्क् रुपयांवर पोहोचला. इराकमधील हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर सराफा बाजारात पर्यायी गुंतवणूक झाली. जागतिक बाजारातही सोन्याचा भाव चार महिन्यांच्या उच्चंकी पातळीवर गेला.सिंगापूरमध्येही सोन्याचा भाव क्.2 टक्क्यांनी उंचावून 1,338.99 डॉलर प्रतिऔंस झाला. हा गेल्या 19 मार्चचा उच्चांक आहे. चांदीचा भावही क्.2क् टक्क्यांनी वाढून 21.44 डॉलर प्रतिऔंसवर राहिला. 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 48क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,68क् आणि 28,48क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. गेल्या 26 जून रोजी ही पातळी होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. या मौल्यवान धातूमध्ये गेल्या 2क् जून रोजी एकाच दिवशी 6क्5 रुपयांची वाढ झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)