सोने-चांदीचे भाव आणखी घसरले

By Admin | Updated: July 25, 2014 23:29 IST2014-07-25T23:29:41+5:302014-07-25T23:29:41+5:30

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारीही सलग दुस:या दिवशी सोने- चांदीच्या भावात घसरण नोंदली गेली.

Gold and silver prices slid further down | सोने-चांदीचे भाव आणखी घसरले

सोने-चांदीचे भाव आणखी घसरले

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारीही सलग दुस:या दिवशी सोने- चांदीच्या भावात घसरण नोंदली गेली. सोन्याचा भाव मागणीअभावी 1क्क् रुपयांनी खाली येऊन 28,1क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भाव 6क्क् रुपयांनी कोसळून 44,4क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने सराफा बाजारातील मागणीला फटका बसला. समभाग बाजारात पर्यायी गुंतवणूक झाली. याचाही देशी बाजारधारणोवर सकारात्मक परिणाम झाला.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.2 टक्क्याने खाली येऊन 1,291.64 डॉलर प्रतिऔंस झाला.
राजधानी दिल्लीच्या बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1क्क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 28,1क्क् रुपये आणि 27,9क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 2क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 24,7क्क् रुपयांवर आला.
तयार चांदीचा भाव 6क्क् रुपयांनी कोसळून 44,4क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 62क् रुपयांनी घटून 44,क्15 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही 2,क्क्क् रुपयांच्या घसरणीसह खरेदीसाठी 78,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 79,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

 

Web Title: Gold and silver prices slid further down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.