सोन्या-चांदीच्या भावाला लाभली पुन्हा झळाळी
By Admin | Updated: July 10, 2014 10:04 IST2014-07-10T00:52:55+5:302014-07-10T10:04:20+5:30
खरेदीदार सराफा बाजारात परतल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव बुधवारी पुन्हा एकदा वाढले. 65 रुपयांच्या वाढीसह सोने 28,125 रुपये तोळा झाले.

सोन्या-चांदीच्या भावाला लाभली पुन्हा झळाळी
नवी दिल्ली : खरेदीदार सराफा बाजारात परतल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव बुधवारी पुन्हा एकदा वाढले. 65 रुपयांच्या वाढीसह सोने 28,125 रुपये तोळा झाले. तर 200 रुपयांच्या वाढीसह चांदी 45,100 रुपये किलो झाली.
व्यापा:यांनी सांगितले की, शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सराफा बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. त्याचा परिणाम होऊन गुंतवणूकदार, ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली.
त्याचप्रमाणो जागतिक बाजारातही सोने-चांदी तेजीत होते. लंडन बाजारात सोन्याच्या भावात 0.5 टक्क्यांची वाढ झाली. त्याबरोबर तेथील सोने 1,326.18 डॉलर प्रतिऔंस झाले. 3 जुलैनंतरचा हा सर्वोच्च भाव ठरला आहे. 0.5 टक्क्यांच्या वाढीसह चांदीचा भाव 21.14 डॉलर प्रति औंस झाला.
राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धता आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 65 रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,125 रुपये आणि 27,925 रुपये प्रति 10 ग्राम झाला. आठ ग्रामच्या सोन्याच्या गिन्नीचा भाव 100 रुपयांनी वाढून 24,900 रुपये झाला.
तयार चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढून 45,100 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 210 रुपयांनी वाढून 44,935 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 79 हजार रुपये शेकडा आणि विक्रीसाठी 80 हजार रुपये शेकडा असा स्थिर झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)