सोने-चांदीचे भाव कोसळले

By Admin | Updated: July 8, 2014 00:15 IST2014-07-08T00:15:09+5:302014-07-08T00:15:09+5:30

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 150 रुपयांनी कोसळून 28,200 रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला.

Gold and silver prices collapsed | सोने-चांदीचे भाव कोसळले

सोने-चांदीचे भाव कोसळले

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 15क् रुपयांनी कोसळून 28,2क्क् रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणोनिर्मात्यांच्या मागणीवरही याचा दबाव पडल्याने चांदीचा भाव 2क्क् रुपयांनी उतरून 44,9क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
जागतिक बाजारात अमेरिकी डॉलरचे मूल्य मजबूत झाल्याचा बाजारधारणोवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे समभाग बाजारात पर्यायी गुंतवणूक झाली, अशी माहिती बाजार जाणकारांनी दिली.
सर्वसाधारणपणो हाच कल चांदीच्या भावतही दिसून आला. तयार चांदीचा भाव 2क्क् रुपयांनी कमी होऊन 44,9क्क् आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 85 रुपयांनी स्वस्त होऊन 44,71क् रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये आणि विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.6 टक्क्याने कमी होऊन 1,312.48 डॉलर प्रतिऔंस झाला.
चांदीचा भावही 1.3 टक्क्याने घटून 2क्.9क् डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 15क् रुपयांनी उतरून अनुक्रमे 28,2क्क् रुपये आणि 28,क्क्क् रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला.
आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला.

 

Web Title: Gold and silver prices collapsed