"आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराज

By Admin | Updated: April 11, 2017 13:31 IST2017-04-11T13:31:51+5:302017-04-11T13:31:51+5:30

कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे. त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही.

Going out of "Out of the Way" to save Kulbhushan - Swaraj | "आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराज

"आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराज

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे. त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. काहीही करुण कुलभूषण यांना सरकार वाचवेल अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. कुलभूषण सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, "आउट ऑफ द वे" जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल अशी भूमिका स्वराज यांनी मांडली.
कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार आहे, त्यांच्याकडे भारताचा अधिकृत व्हिसा असताना त्यांच्यावर हेर असल्याचा शिक्का का? कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व केलं जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिला.लोकसभेत आज कुलभूषण जाधव यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता, त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला काँग्रेसनं दिला. त्यानंतर विविध पक्षांच्या खासदारांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर स्वतःची मतं मांडली आहेत.
हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टानं काल फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी शिक्षेविरोधात निदर्शनं सुरू आहेत. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.

कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसी
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं आहे. कुलभूषण यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं स्वतःची सर्व शक्ती पणाला लावण्याची गरज आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा, असंही ते म्हणाले आहेत.
आता तरी मोदी सरकारने दबावतंत्राचा वापर करावा, मोदींनी सर्व शक्ती पणाला लावून कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवावा. गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाकिस्तानवर दबाव टाकावा. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कोणतेही पुरावे नसताना थेट कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षाची सुनावली. पुरावे नसतानाही पाकिस्तान नाटक करत आहे. तरीही कुलभूषण जाधव यांना वाचवणं हेच आपलं पहिलं ध्येय्य असायला, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

 

Web Title: Going out of "Out of the Way" to save Kulbhushan - Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.