गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही

By Admin | Updated: December 29, 2014 04:09 IST2014-12-29T04:09:55+5:302014-12-29T04:09:55+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे मंदिर मेरठमध्येच काय तर संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि देशाच्या इतर कुठल्याही

Godse's temple will not stop | गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही

गोडसेचे मंदिर होऊ देणार नाही

मेरठ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे मंदिर मेरठमध्येच काय तर संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि देशाच्या इतर कुठल्याही राज्यात कदापि बांधू दिले जाणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने (यूपीएनएस) रविवारी दिला.
संघटनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी येथे आयोजित एका बैठकीत एका नि:शस्त्र संताला गोळ्या घालून ठार करणारी व्यक्ती हिंदूंचे दैवत कसे होऊ शकते? असा सवाल उपस्थित केला आणि असे मंदिर कुणी बांधले तर ते उद्ध्वस्त करण्यात येईल, असा इशारा दिला. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शहरात शारदा मार्गावर नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी लगेच कार्यवाही सुरू केली आहे, तर दुसरीकडे यूपीएनएसने मंदिर निर्मात्यांसोबत निपटण्याचा इशारा दिल्याने हिंदू महासभा व नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Godse's temple will not stop