कोकणात गोव्यातील पर्यटकांवर हल्ला
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30

कोकणात गोव्यातील पर्यटकांवर हल्ला
>दोडामार्ग येथील प्रकार : गाडी फोडली; दांडक्याने मारहाणदोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून रविवारी सायंकाळी घरी परतणार्या गोव्यातील पर्यटकांना बाजारपेठेत गाठून स्थानिक तरुणांच्या टोळक्याने लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. झरेबांबर येथील या टोळक्याने पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करीत गाडीही फोडली. पर्यटकांच्या डोक्यावर बाटल्या मारण्यात आल्या. त्यात मनोरथ मांजरेकर (35) व महेश नार्वेकर (32, दोघेही रा. शारपोरा बारदेश, गोवा) जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोडामार्ग पोलीस ठाण्यात स्थानिक युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हाणामारीमुळे संध्याकाळी बाजारपेठेत लोकांची धावपळ उडाली. गावकर्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या व भांबावलेल्या पर्यटकांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तर हल्लेखोर तरुणांचे टोळके गर्दीचा फायदा घेत पसार झाले. दुपारी बाराच्या सुमारास गोव्यातील पर्यटक व झरेबांबर येथील स्थानिक युवकांमध्ये गाडी पार्किंगवरून वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत मद्याच्या नशेत असलेल्या युवकांच्या टोळक्याला तेथून जाण्यास सांगितले होते. संध्याकाळी गोव्याचे पर्यटक घरी परतत असताना झरेबांबर येथे टोळक्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या पर्यटकांनी त्यांची दोन्ही वाहने भरधाव वेगाने नेली. टोळक्याने दोन वाहनांतून त्यांचा पाठलाग केला होता. (प्रतिनिधी)-------------------------(फोटोडेस्क) (छाया : वैभव साळकर)