गोवा- मुंबई पर्यटन रेल्वे

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

गोवा-मुंबई पर्यटन रेल्वे

Goa- Mumbai Tourism Railway | गोवा- मुंबई पर्यटन रेल्वे

गोवा- मुंबई पर्यटन रेल्वे

वा-मुंबई पर्यटन रेल्वे
महिना अखेरीस - प्रभू
पणजी : मुंबई-गोवा अशी खास पर्यटन रेल्वेगाडी या महिन्याच्या अखेरीस सुरू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली.
प्रभू हे करमळी येथील रेल्वे स्थानकावर लेक रिसॉर्र्टचे भूमिपूजन आणि इन्टरप्रिटेशन सेंटरचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने गोवा भेटीवर आले होते. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोवा व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने विशेष पर्यटन रेलसेवा सुरू केली जाईल. मुंबई व गोव्याचे पर्यटन वाढविणे हा त्यामागील हेतू आहे, असे केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले. आयसीआरटीसीकडून कोकण रेल्वेच्या मार्गावरूनच ही रेल्वे चालविली जाईल,असे त्यांनी सांगितले.
दि. ३१ डिसेंबरपूर्वी सुरू होणार्‍या या पर्यटन रेल्वेच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार गोवा व महाराष्ट्र सरकारशी लवकरच समझोता करार करील. खासगी क्षेत्रापेक्षाही भारतीय रेल्वे आता जलदगतीने काम करत आहे. आम्ही निर्णय घेण्यासाठी आता विलंब करत नाही. शिख, बुद्धीस्त आणि सुफी पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठीही अशा प्रकारच्या विशेष रेलगाड्या सुरू करण्याचा भारतीय रेल्वे मंत्रालयाचा हेतू आहे, असे प्रभू यांनी नमूद केले.
भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा हेतू नाही; पण रेल्वेची क्षमता व मालमत्तांचा दर्जा वाढविण्यासाठी खासगी क्षेत्राकडून निधी प्राप्त केला जाईल. देशभरातील आठ हजार रेल्वे स्थानकांचा प्राधान्याने दर्जा वाढविला जाईल. आम्ही याबाबतचा प्लॅन तयार करू. संकेतस्थळावरही अगोदर आम्ही माहिती उपलब्ध करू. निविदांसह सर्व प्रक्रिया पारदर्शक असेल. निविदांबाबतची कोणतीच फाईल निर्णयासाठी मंत्र्याकडे पाठवू नका, अशी सूचना आपण अधिकार्‍यांना केली आहे. रेल्वे स्थानकांचा दर्जा वाढवा, ही प्रवासी वर्गाची वाढती मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावर अपघात वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप तपशीलवार असे ऑडिट करण्याचा आदेश आपण कोकण रेल्वे महामंडळाला दिला आहे, असे प्रभू यांनी सांगितले.
परुळेकरांकडून स्वागत (चौकट)
गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी थिवी ते करमळीपर्यंत प्रभूंसोबत रेल्वेने प्रवास केला. गोवा-मुंबई अशी पर्यटक रेल्वे सुरू करण्याची विनंती आपणच केली होती. प्रभू यांनी ती लगेच मान्य केली. आता आठ दिवसांत रेल्वेचे अधिकारी गोव्यात येतील. पर्यटन खात्याशी बैठक होईल. प्रारंभी आठवड्यातून किमान दोनवेळा ही रेलगाडी गोव्यात पाठवावी, अशी विनंती आम्ही केली असल्याचे परुळेकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Goa- Mumbai Tourism Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.