गोवा क्षत्रिय मराठा समाजातर्फे
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:03+5:302015-03-08T00:31:03+5:30
शिवजयंती उत्साहात

गोवा क्षत्रिय मराठा समाजातर्फे
श वजयंती उत्साहातसावईवेरे : गोवा क्षत्रिय मराठा समाज, खांडोळा शाखेतफेर्ं शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर गोविंद गावडे, संतोष तारी, शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष दिलीप नाईक, संस्थेचे अध्यक्ष रमेश फडते, खांडोळाच्या पंच र्शध्दा फडते, सत्कारमूर्ती दामोदर फडते व पांडुरंग फडते उपस्थित होते.यावेळी बोलताना गोविंद गावडे यानी सांगितले की शिवजयंती उत्सव हा महान राजाच्या आठवणींना उजाणा देणारा उत्सव असला तरी तो केवळ उत्सव न राहता शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकणारा उत्सव असल्याचे ते म्हणाले. यावेळी संतोष तारी, दिलीप नाईक, र्शध्दा फडते यानीही विचार मांडले. प्रथम रमेश फडते यानी स्वागत केले. सुदेश तारी यानी पाहुण्यांची ओळख करुन दिली. खांडोळ परिसरातील क्षत्रिय समाजातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विदय़ार्थ्यांचा मान्यवरांहस्ते गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दामोदर फडते व पांडुरंग फडते यांचाही सत्कार करण्यात आला. शेवटी चेतन तारी यानी आभार मानले.(प्रतिनिधी) ढँ3 : 0703-स्रल्ल-05कॅप्शन - शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित गोविंद गावडे, संतोष तारी, दिलीप नाईक व इतर.(छाया- विनायक नाईक)