पान-२ राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:02+5:302014-12-23T00:04:02+5:30
राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी

पान-२ राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी
र ष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटीपणजी : गोव्यात राष्ट्रीय महामार्ग ४ अ, १७, १७ अ तसेच १७ ब या मार्गांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्राने गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारला ५८ कोटी ५९ लाख रुपये दिले. २0१४-१५ या चालू आर्थिक वर्षात २९ कोटी रुपये दिल्याचे केंद्रीय रस्ता वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काही भागात महामार्गांच्या दुरुस्तीचे सोपविण्यात आलेले काम अजून सुरू व्हायचे आहे. हे काम प्राधिकरण आपण थेट करणार आहे किंवा राज्य सरकारच्या बांधकाम खात्यांमार्फत ही कामे होणार आहेत. जेथे कामे सुरू झालेली आहेत ती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर असून देखभाल दुरुस्तीचे संबंधित काम कंत्राटदार करणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग ४ च्या विस्ताराबाबत अन्य एका प्रश्नावरील लेखी उत्तरात मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, विस्ताराचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात असून निधीची उपलब्धता आणि प्राधान्यक्रम लावूनच काम केले जात आहे. तब्बल ३0१२ कोटी रुपये खर्चाची दोन कामे सध्या सुरू असून डिसेंबर २0१५ पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम चालू असलेल्या मार्गांच्या बाबतीत कुठल्याही निविदा रद्द केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)