गोव्यात आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 4, 2016 22:41 IST2016-05-04T22:36:15+5:302016-05-04T22:41:09+5:30

येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

In Goa, the accused filed for rape | गोव्यात आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

गोव्यात आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 4- येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश यांच्यावर दाखल केलेला आहे. पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी हे प्रकरण पणजी पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहे. त्यांनीच ही माहिती दिली.
दरम्यान, बाबूश यांनी लोकमतशी बोलताना या आरोपांचा इन्कार केलेला आहे. ते म्हणाले, मिरामार येथे ही मुलगी आपल्या एका आस्थापनात सेल्सगर्ल कम कॅशीअर म्हणून कामाला होती. तिचे करंजाळे येथील पालक आपले मतदार आहेत. आपल्या एका पाठीराख्याच्या विनंतीनुसार मतदारसंघातील गरजूला मदत म्हणून तिला आपण नोकरी दिली होती. तिने नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी कॅशमधून चार हजार रुपये उचलल्याची तक्रार आपल्याकडे इतर कर्मचाऱ्यांनी केली. शिवाय तिने खोटे सांगून आणखी तीन हजार रुपये उसने घेतले. इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून तिला कामावरून काढून टाकले. तिच्या फेसबुकवर पाहिले तर आपल्याला अनेक गोष्टी समजून येतील, असे आपल्याला अनेकांनी सांगितले आहे. कामावरून काढल्यानंतर स्वत:च्या आईचेच दागिने तिने चोरल्याची तक्रार तिच्या आईनेच पोलिसांत केल्यानंतर तिला 'अपना घर'मध्ये पाठवले होते. या मुलीने तेव्हा आपल्याला आईबरोबर राहायचे नाही, तर मिरामार येथे फें्रडसोबत राहायचे असल्याचे पोलिसांना सांगितले होते. आता चोरीच्या तक्रारीचे बलात्काराच्या तक्रारीत कसे रूपांतर झाले हे आपल्याला समजले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: In Goa, the accused filed for rape