शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ दर्शनाला जा आता थेट कारने! यात्रेकरूंसाठी ‘बीआरओ’ने तयार केला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:14 IST

अमरनाथ हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीट उंचीवर स्थित आहे.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंसाठी  खुशखबर आहे. आता त्यांना थेट अमरनाथ धामपर्यंत मोटारीने जाता येणार आहे. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) नुकताच अमरनाथला मोटारीने जाता येण्यासारखा रस्ता बांधून पूर्ण केला असून मोटारीने गेलेल्या प्रवाशांच्या पहिला जत्थ्याने नुकतेच अमरनाथ दर्शन घेतले.अमरनाथ हे पर्वताच्या कुशीत दक्षिण काश्मीरमध्ये ३८८८ मीट उंचीवर स्थित आहे. तेथे पोहोचणे म्हणजे भाविकांची कसोटीच असते.  दुमल येथून बालटाल बेस कँप मार्गे हा रस्ता थेट अमरनाथपर्यंत बांधून एक इतिहास रचण्यात आला आहे, असे बीआरओतर्फे सांगण्यात आले. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाने या दुहेरी रस्त्याच्या देखरेखीची जबाबादारी बीआरओवर सोपवली होती. त्यानंतर हा रस्ता मोटारीने जाण्यायोग्य दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. थेट अमरनाथपर्यंतचा रस्ता तयार झाल्यामुळे भाविकांची सोय झाली असली तरी पर्यावरणवाद्यांनी मात्र धोक्याचा इशारा दिला आहे. पीडीपीने याला सर्वात मोठा गुन्हा म्हटले आहे.

दरडी कोसळण्याचे प्रकार वाढतीलमाजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या रस्त्यामुळे हिमालयातील उतार अस्थिर होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू शकतात. सरकारने दाल सरोवर, सोनमर्ग, पहेलगाम आदी परिसरात बांधकामांना पूर्णपणे बंदी घातली आहे. मग अमरनाथ गुंफा परिसरातील पर्यावरण राखण्याची आपली जबाबदारी नाही का?

भाविक ‘ती’ परंपरा कायम ठेवतील...

‘काश्मीरच्या नागरिक शेकडो वर्षांपासून अमरनाथच्या भाविकांना आपल्या खांद्यावर वाहून नेतात. ही परंपरा पुढेही कायम चालू राहील. कदाचित अनेक भाविकांना अमरनाथला कारने जावे वाटणार नाही. ते माता वैष्णोदेवीला जातात त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने अमरनाथ यात्रेला जाणे पसंत करतील आणि स्थानाचे पावित्र्य राखतील’, असा आशावादही ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर