शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

गो एअरच्या कर्मचाऱ्यांना विनावेतन सुटीवर जाण्याचे आदेश, कंपनीने दिले असे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 14:47 IST

कोरोना व्हायरसमुळे उड्डानांची संख्या कमी झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ठळक मुद्देगो एअर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेतभारतात कोरोनावायरसच्या रुग्णांची संख्या 147वर पोहोचली आहे.गो एअरनेही आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द केली आहेत. 

नवी दिल्ली - जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका आता विमान कर्मचाऱ्यांनाही बसायला सुरूनात झाली आहे. स्वस्त उड्डाणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गो एअर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. 

देशभरात कोरोना व्हायरची लागण होणाऱ्या नागरिकांमध्ये सात्त्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 147वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात तीन जणांचा मृत्यू झाल आहे.  सेंट्रल रेल्वेनेही 31 मार्च पर्यंत 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय आता गो एअरनेही आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द केली आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे उड्डानांची संख्या कमी झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला आहे. 15 एप्रिलपर्यंत गो एअरची आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द राहतील. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कोरोनाचा परिणाम रक्तपेढ्यांवरही -उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्यधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीय आणि नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुटी, मेळावे-कार्यक्रमावर बंदी व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात असल्याने याचा प्रभाव रक्तदानावर झाला आहे. शिवाय, काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती किंवा संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही फार कमी झाले आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशव्यांचा अपुरा साठा आहे. यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.

रेल्वे विभागालाही फटका -गेल्या पाच दिवसांमध्ये तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी कमी झाले असून, प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. दक्षता म्हणून विविध रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण रोज करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीEmployeeकर्मचारीrailwayरेल्वे