जागतिकीकरणाने समाजाला नवी दिशा दिली
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:45+5:302015-02-14T23:51:45+5:30
के. एस. भट : नाईक महाविद्यालयात चर्चासत्र

जागतिकीकरणाने समाजाला नवी दिशा दिली
क . एस. भट : नाईक महाविद्यालयात चर्चासत्रनाशिक : जागतिकीकरणाने अनेक समस्यांबरोबर अनेक संधी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. भाषा, संस्कृती, साहित्य, शैक्षणिक आदि क्षेत्रांमध्ये संशोधनास यानिमित्ताने भरपूर वाव निर्माण झाला आहे. जागतिकीकरणाने जगण्याचे आयाम बदलून समाजाला एक नवी दिशा दिली आहे, असे मनोगत गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. के. एस. भट यांनी व्यक्त केले.क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे इंग्रजी विभागांतर्गत इंग्लिश लॅग्वेज ॲण्ड ग्लोबलायझेशन विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन व शोधनिबंधाचे प्रकाशन गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. के. एस. भट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. बजरंग कोरडे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड अध्यक्षस्थानी होते. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, विश्वस्त धर्माजी बोडके, बाळासाहेब गामणे, दामोदर मानकर, संचालक माणिकराव सोनवणे, महेश आव्हाड, महेंद्र आव्हाड, कचरू पाटील आव्हाड, शरदराव बोडके आदि उपस्थित होते. या चर्चासत्राचे स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर यांनी केले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. संजय सानप, सूत्रसंचालन प्रा. आनंद सानप यांनी केले, तर आभार प्रा. दिलीप कुटे यांनी मानले.या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देशभरातून एकूण ४५ प्राध्यापकांनी पाठवलेल्या शोध निबंधांपैकी २८ चे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील व बाहेरील विद्यापीठाचे एकूण ७० प्राध्यापक, ४० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रामध्ये गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. के. एस. भट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बजरंग कोरडे यांनी मार्गदर्शन केले.सदर चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दिलीप कुटे, चर्चासत्र संयोजन समितीचे प्रमुख डॉ. संजय सानप, प्रा. आनंद सानप, प्रा. विनया मोरे, प्रा. नलिनी गायधनी, महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)