मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्या - मधू कोडा

By Admin | Updated: August 17, 2015 12:59 IST2015-08-17T12:59:20+5:302015-08-17T12:59:20+5:30

कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्यावे अशी मागणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे.

Give summons to Manmohan Singh as accused - Madhu Koda | मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्या - मधू कोडा

मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्या - मधू कोडा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्यावे अशी मागणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे. कोर्टाने  कोडा यांच्या अर्जाची प्रत सीबीआयला सोपवत त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे. 
कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टात सोमवारी मधु कोडा यांच्यावतीने अर्ज करण्यात आला. या अर्जात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य दोघा जणांना आरोपी म्हणून समन्स पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. कोडादेखील या घोटाळ्यात आरोपी असून गेल्या आठवड्यात या घोटाळ्याप्रकरणी कोडा यांच्यासह सात जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. 

Web Title: Give summons to Manmohan Singh as accused - Madhu Koda