शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, खा. शेट्टींची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 18:06 IST

मराठा समाज हा बहुतांश शेतकरी वर्ग अाहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

नवी दिल्ली - मराठा समाज हा बहुतांश शेतकरी वर्ग अाहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी अाज लोकसभेत नियम 377 नुसार मागणी केली.     यावेळी बोलताना खा. राजू शेट्टी म्हणाले की, देशात हरियाणा, राजस्थान, पंजाब आदी राज्यमध्ये आरक्षणावरून आंदोलने होत आहेत. महाराष्ट्र सोडून सर्वत्र हिंसक घटना घडलेल्या आहेत. मात्र सध्या संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून रस्त्यावर उतरलेला आहे. लाखोंच्या मोर्चे काढले जात असताना सरकारने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. बहुतांश मराठा समाज शेतकरी वर्ग आहे. शेतकरी कर्जबाजारी असून त्याला मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे तोट्यातील शेती, डोक्यावरील वाढते कर्ज, तसेच नोकरीची नसलेली हमी यामुळे मराठा समाजाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सगळ्यात पहिला शेतकर्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये सवलत, त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण आदी तातडीने लागू कराव्यात. देशात सरकारी नोकरदारांना 7 वा वेतन आयोग लागू करताना 1 लाख कोटी रू. ची तरतूद केली. तसेच कार्पोरेट कंपन्यांना 9 लाख कोटी रूपयांची कर्ज सवलत देण्यात आली. शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षण साठी तरतूद कमी आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करून महाराष्ट्रात त्वरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmarathaमराठाreservationआरक्षण