शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या घरवापसीसाठी लष्कर राबवणार 'हे' स्पेशल ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 16:20 IST

काश्मीरमधील दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न

जम्मू-काश्मीर: काश्मीर खोऱ्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु असताना स्थानिक दहशतवादी स्वत:च्या कुटुंबीयांना भेटायला घरी येत असल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी त्यांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी निशस्त्र घरी परतत असल्यानं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लष्कराचे अधिकारी स्थानिक दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत.दहशतवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा आणि समाजाच्या मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी बातचीत सुरू केली आहे. 'एन्काऊंटरमध्ये मारले जाण्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सन्मानानं जगा,' असा संदेश कुटुंबीयांनी दहशतवाद्यांना द्यावा, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्थानिक दहशतवाद्यांनी मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्करानं 'ऑपरेशन ऑल इन' सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाट चुकलेल्या तरुणांना आणखी एक संधी दिली जावी, असा लष्कराचा विचार आहे. 'स्थानिक दहशतवादी तरुण त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी परतत आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. कुटुंबीयांनी त्यांच्या मुलांची समजूत घालून त्यांना मूळ प्रवाहात आणावं, असं आम्हाला वाटतं. त्यांना त्यांचं अर्धवट राहिलेलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचं असल्यास त्यांना तशी संधीदेखील देण्यात येईल,' अशी माहिती लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आई, वडिल, नातेवाईक, त्यांच्या गावचे सरपंच यांच्याशी संवाद साधला जात आहे. 'एन्काऊंटरमध्ये जीव गमावण्यापेक्षा सर्वसामान्य आयुष्य जगा,' असा संदेश दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला