शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात सेवा बजावताना जीव गमावलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा द्या- खासदार श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 18:34 IST

डॉक्टरांवरील हल्ल्याचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना करावी; शिंदेंची मागणी

नवी दिल्ली: डॉक्टरांवर होत असलेल्या अनेक खटले हे न्यायप्रविष्ट आहेत. हे खटले निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना करुन ते जलद गतीने निकाली काढावेत. त्याचबरोबर कोरोना काळात सेवा बजावित असताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा, अशी मागणी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संसदीय अधिवेशनात केली आहे.ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

संसदीय अधिवेशनात आरोग्य विषय विधेयकावर चर्चेच्या दरम्यान खासदार शिंदे यांनी उपरोक्त मागणी केली. खासदार शिंदे यांनी सांगितले की, डॉक्टरांवरील हल्ल्याच्या 32 लाख केसेस न्यायप्रविष्ट आहे. त्यापैकी 9 लाख केसेस या दिवाणी स्वरुपाच्या असून 23 लाख केसेस फौजदारी स्वरुपाच्या गंभीर आहेत. 10 टक्के खटले हे गेल्या दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. हे खटले निकाली काढण्याचा एक वर्षाचा कालावधीत घट करुन तो कालावधी आणखी कमी करावा. 3 महिन्यांत हे खटले निकाली काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता?; शेट्टींचा कंगनावर निशाणा

कोराना आपत्ती काळात डॉक्टर, पॅरामॅडिकल स्टाफ, पोलीस यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून सेवा कार्य व कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे आज भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात असताना देखील भारतात मृत्यूचा दर कमी आहे. हे डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. कोरोना काळात सेवा बजाविणाऱ्या 500 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर 50 हजार पेक्षा जास्त डॉक्टर बाधित झालेले आहे. त्यामुळे केवळ अनुभवी डॉक्टरच नव्हते. तर नुकतेच पदवी ग्रहण केलेल्या नवख्या डॉक्टरांचाही समावेश आहे. कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी सरकारकडे केली आहे. ही सूचना त्यांनी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. कोरोना काळात कोरानाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांनी जीवाची पर्वा न करता सर्वेक्षणाचे काम केले आहे. ही मंडळी डेली व्हेजेसवर काम करतात. त्यांना पगार देण्यात यावा. तसेच ग्रुप सी चा दर्जा दिला जावा अशी मागणी खासदारांनी केली. 

तसेच जीएसटीचा परतावा महाराष्ट्र राज्याला लवकर मिळावा जेणे करुन कोरोनाशी सामना करताना राज्याला निधीची अडचण भासू नये अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेcorona virusकोरोना वायरस बातम्या