नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

Give immediate help to the victims | नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

कसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या
कामठी : तालुक्यात १३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आजनी-गुमथळा, वडोदा-भूगाव, कोराडी-येरखेडा तसेच महादुला-लोणखैरी आदी भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे. बहुतांश पिके खरडली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षणातून आलेल्या नोंदीनुसार नुकसानग्रस्तांना तत्काळ शासनाने मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कुंदा आमधरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
१३ ऑगस्टला झालेल्या जोरदार पावसामुळे कन्हान नदी, पिवळी नदी आणि नाग नदीच्या काठावरील शेतातील पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आधीच दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पावसाने थैमान घातल्याने पिकांची नासाडी झाली. नदीकाठावरील शेतातील पिके अक्षरश: खरडून निघाली तसेच घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे व इतर मालमत्तेचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देण्याची मागणीही कुंदा आमधरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Give immediate help to the victims