शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

"नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या", भाजप खासदाराची मोदी सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:45 IST

२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ही मागणी भाजप नेते आणि बेगुसराय मतदारसंघाचे खासदार गिरिराज सिंह यांनी केली आहे. नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भारतरत्न देण्यात यावे, असे म्हणत गिरीराज यांनी म्हटले आहे.

२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "कोणीही संभ्रमात राहू नये. लालूजी सर्वतोपरी प्रयत्न करतील पण बिहार विधानसभेच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. नितीश कुमार इतके दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत. आज तीस वर्षांच्या मुलांनी लालूजींचे जंगलराज पाहिलेले नाही."

दरम्यान, यापूर्वी नितीश यांचा पक्ष जनता दलानेही (युनायटेड) एनडीए आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. जेडीयूचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह आणि पक्षाचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तसाच राहील.

दुसरीकडे, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी देखील म्हटले आहे की, एनडीए (NDA) पुढील वर्षी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  लढवेल. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए काम करत असून या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत राहणार असल्याचे सम्राट चौधरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, 2025 च्या अखेरीस बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा