पोलिसांत महिलांना ३३% आरक्षण द्या
By Admin | Updated: August 4, 2014 02:01 IST2014-08-04T02:01:49+5:302014-08-04T02:01:49+5:30
महिलांविरुद्धचे लैंगिक अत्याचार आणि गुन्ह्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर सर्व राज्यांनी पोलीस दलांत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे

पोलिसांत महिलांना ३३% आरक्षण द्या
नवी दिल्ली : महिलांविरुद्धचे लैंगिक अत्याचार आणि गुन्ह्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर सर्व राज्यांनी पोलीस दलांत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत़
महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे़ खुद्द मनेका यांनी याबाबत माहिती दिली़ मी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे़ गुजरात सरकारने आपल्या पोलीस दलात ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ अन्य राज्यांनीही गुजरातकडून प्रेरणा घ्यावी, असे मी पत्रात लिहिले आहे़
महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी आपल्या मंत्रालयाने अनेक उपाययोजना चालवल्या आहेत़ एकीकृत बालविकास योजनेतील त्रुटी दूर करण्याचे मंत्रालयाचे प्रयत्न आहेत़ याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ठोस व्यवस्था आणण्याचाही विचार आहे, असे त्यांनी सांगितले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)