कातरवाडीच्या सरपंचपदी गीता झाल्टे बिनविरोध
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:18+5:302015-08-16T23:44:18+5:30
दरेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जागेवर अनु. जमातीच्या नमिता पारूबा पवार या महिलेची बिनविरोध निवड करून एक वेगळा आदर्श घालून देण्यात आला. तसेच बिनविरोध निवड झालेल्या यापूर्वीच्या सदस्यांमध्ये सातपैकी पाच महिला सदस्य आहेत.

कातरवाडीच्या सरपंचपदी गीता झाल्टे बिनविरोध
द ेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जागेवर अनु. जमातीच्या नमिता पारूबा पवार या महिलेची बिनविरोध निवड करून एक वेगळा आदर्श घालून देण्यात आला. तसेच बिनविरोध निवड झालेल्या यापूर्वीच्या सदस्यांमध्ये सातपैकी पाच महिला सदस्य आहेत. कातरवाडी येथे निवडणूक अधिकारी एस. व्ही. शहाडे, ग्रामसेवक एम. आर. डांगरे, तलाठी के. बी. सालमुठे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. सथेरा ग्रामपंचायत सदस्य बाबूराव झाल्टे, रावसाहेब झाल्टे, गीता झाल्टे, जिजाबाई झाल्टे, नमिता पवार, चहाबाई सोनवणे, वाल्याबाई झाल्टे उपस्थित होते. या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्या समर्थकांनी व ग्रामस्थांनी गुलाल उधळून व फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.यावेळेस माजी सरपंच रामदास झाल्टे, दत्तू झाल्टे, बबन झाल्टे, संजय झाल्टे, नारायण झाल्टे, चांगदेव झाल्टे, काशीनाथ झाल्टे, सुकदेव गोडगे, सुधाकर झाल्टे, संजय झाल्टे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच गीता झाल्टे यांनी यापूर्वी चांदवड कृउबा संचालक पद, ग्रामपंचायत सदस्य तसेच सध्या त्यांची जिल्हा दूध संघाच्या तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाली आहे.(वार्ताहर)------कॅप्शनकातरवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंचपदी गीदा झाल्टे व उपसरपंचपदी नमिता पवार यांच्या निवडीप्रसंगी सदस्य बाबूराव झाल्टे, रावसाहेब झाल्टे, जिजाबाई झाल्टे, दत्तू झाल्टे, नारायण झाल्टे आदि.------