शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

चेहडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली

चेहडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली
नाशिकरोड : पत्ताविचारण्याच्या बहाण्याने एका इसमाने थांबविल्यानंतर पुढे आम्हाला थेट रेल्वेगाडीतच जाग आली अशी आपल्याच अपहरणाची कहाणी विद्यार्थिनीनी रचल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला.
चेहेडी पंपिंग येथील इयत्ता नववीतील तीन विद्यार्थिनी सकाळी शाळेत जादा तासिका असल्याने शाळेत जाण्यासाठी निघाल्या, मात्र दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीने आपल्या पालकांना दूरध्वनी करून आपण रेल्वेगाडीत असल्याचे सांगितले. सकाळी शाळेत जाताना
रस्त्यात टायर पंक्चरच्या दुकानाजवळ तीन ते चार अनोळख्या इसमांनी आम्हाला एक पत्ता वाचण्यास दिला. त्यानंतर आम्हाला काहीच कळले नाही. आता आम्ही रेल्वे गाडीत असून, जळगाव जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले.
विद्यार्थिनींच्या या फोनमुळे पालकांना धक्काच पोहचला. मुलींचे अपहरण झाल्याची बाब गावात पसरल्याने एकच कल्लोळ उडाला. गावकर्‍यांनी धावतच शाळा गाठली असता तिघी मैत्रिणींपैकी एक शाळेत येऊन गेल्याचे समजले, तर दुसर्‍या दोघी शाळेत आल्याच नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. काही मिनिटांतच तीनही मुलींच्या पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आपल्या मुलींनी केलेल्या फोनवरील माहिती पोलिसांना सांगितले.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक रवींद्र कर्‍हे, ठाणे अंमलदार राजेंद्र वाघ यांनी तत्काळ जळगाव रेल्वे पोलीस ठाणे व तेथील अधिकार्‍यांना संपर्क साधला. मुलींनी ज्या मोबाइलवरून संपर्क केला होता. त्यावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो भ्रमणध्वनी एका शाहरूख नावाच्या इसमाला लागल्याने सार्‍यांनाच धडकी भरली. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता प्रवासात त्या भेटल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यास मुलींना जळगाव रेल्वे पोलीस चौकीत सोडून देण्याचे सांगितले.
जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेण्यास सुरुवात केली. पादचारी पुलाजवळ त्या तिघी मुली रडत होत्या. ठाकूर यांनी त्या मुलींची व युवकांची विचारपूस केल्यानंतर नाशिकरोड येथील त्याच या तीन विद्यार्थिनी असल्याचे निष्पन्न झाले. ठाकूर यांनी नाशिकरोड पोलिसांना मुली सुखरूप असल्याचे कळविल्याने पालकांना धीर आला. ठाकूर यांनी एका रेल्वे पोलिसांसोबत सायंकाळी त्या तीनही मुलींना नाशिकरोडला पाठविले. सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलिसांनी मुलींना पालकांच्या हवाली केले.
नाशिकरोडला आल्यानंतर या मुलींनी आपण बनाव रचल्याचे कबूल केले. शाळेत जादा तासिका होती. परंतु शाळेत जाण्याऐवजी आपण रेल्वेगाडीने लासलगावपर्यंत जाऊ असा विचार या तिघींनी केला. त्यातील एक मुलगी शाळेत आली मात्र शाळेतून लवकर निघाली त्यानंतर तिघींनीही नाशिकरोड स्थानक गाठले. तेथून त्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसल्या. परंतु गाडी लासलगाव येथे थांबत नसल्याने गाडी पुढे निघून गेली. त्यानंतर मात्र या मुली घाबरल्या आणि त्यांनी प्रवासातच एका सह प्रवाशाला विनंती करून त्याच्या भ्रमणध्वनीवरून पालकांना खोट्या अपहरणाची कहाणी सांगितली.
--इन्फो--
ठाकूर यांची तत्परता
जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे काही वर्षांपूर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नाशिकरोडच्या तीन विद्यार्थिनी रेल्वेने जळगावला उतरल्याचे समजताच ठाकूर यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तीनही विद्यार्थिनींना जळगाव रेल्वेस्थानकावर शोधून काढले. त्यानंतर त्यांना धीर देऊन दुपारी जेवण दिले व आपल्या पोलिसांसोबत त्या तिघींना रेल्वेने नाशिकरोडला पाठविले. ठाकूर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नाशिकरोड पोलीस व मुलींच्या पालकांनी त्यांना धन्यवाद दिले.