महिलेने पतीलाच करायला लावला मैत्रिणीवर बलात्कार
By Admin | Updated: August 17, 2014 14:25 IST2014-08-17T14:22:46+5:302014-08-17T14:25:03+5:30
पतीला अन्य महिलेसोबत पाहण्याच्या इच्छेतून एका महिलेने पतीच्या साथीने मैत्रिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे.

महिलेने पतीलाच करायला लावला मैत्रिणीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १७ - पतीला अन्य महिलेसोबत 'पाहण्या'च्या इच्छेतून एका महिलेने पतीच्या साथीने मैत्रिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी महिला व तिच्या पतीला अटक केली आहे.
बंगळुरुतील चिक्कानपूरा भागात आशा जालाहल्ली आणि तिचा पती दिलीप हे दोघे राहतात. या दाम्पत्त्याला चार वर्षांची मूलगीदेखील आहे. आशाला तिच्या पतीला अन्य महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना बघायची इच्छा होती. या नादात आशाने तिच्या शेजारी राहणा-या मैत्रिणीचाच आपले शिकार केले. आशाने तिच्या शेजारी राहणा-य मैत्रिणीला २७ जुलौरोजी गप्पा मारण्याच्या बहाण्याने घरी बोलवले. यानंतर आशाने तिच्याशी अश्लील विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. पिडीत महिलेने तिला या विषयांवर बोलण्यास नकार दिला. अखेरीस आशाने तिला दमदाटी केली व माझ्यापतीसोबत 'सहकार्य' कर अन्यथा तुझ्या पतीला व पाच वर्षांच्या मुलाला मारुन टाकीन अशी धमकी तिला दिली. यानंतर दिलीपने पिडीत महिलेवर बलात्कार केला व आशा हा सर्व प्रकार बघत होती. १० ऑगस्टलाही आशाने पिडीत महिलेला पुन्हा घरी आणून पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावले. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीत महिलेने तिच्या पतीला सर्व घटना सांगितली व यानंतर या दाम्पत्त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशा व तिचा पती दिलीप या दोघांना अटक केली असून दोघांनाही न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले आहे.