गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या वादातून विद्यार्थ्याला निर्वस्त्र करुन मारहाण

By Admin | Updated: September 4, 2014 11:43 IST2014-09-04T11:42:43+5:302014-09-04T11:43:48+5:30

बंगळुरु येथे गणेशोत्सवाच्या वर्गणीवरुन एका विद्यार्थ्याला त्याच्या वरिष्ठ सहका-यांनी निर्वस्त्र करुन अमानूष मारहाण केल्याची घटना घडली आहे.

The girl was disfigured by the debate over the Ganesh festival | गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या वादातून विद्यार्थ्याला निर्वस्त्र करुन मारहाण

गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या वादातून विद्यार्थ्याला निर्वस्त्र करुन मारहाण

>ऑनलाइन टीम
बंगळुरु, दि. ४ - महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असतानाच बंगळुरु येथे गणेशोत्सवाच्या वर्गणीवरुन एका विद्यार्थ्याला त्याच्या वरिष्ठ सहका-यांनी निर्वस्त्र करुन अमानूष मारहाण केल्याची घटना घडली आहे. 
पूर्व बंगळुरुतील वर्थूर येथील महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये कार्तिक टी हा १७ वर्षीय तरुण शिकतो. कार्तिकचे वडिल हे रिक्षाचालक आहेत. सोमवारी कार्तिकच्या महाविद्यालयातील  वरिष्ठ विद्यार्थी गणेशोत्सवासाठी फक्त कनिष्ठ विद्यार्थ्यांकडूनच जबरदस्तीने वर्गणी गोळा करत होते. कार्तिकने याबाबत सिनीअर्सना जाब विचारला होता. त्यावेळी किरकोळ वादही झाला होता. मंगळवारी कार्तिक महाविद्यालयात आला असता १५ विद्यार्थ्यांनी त्याला गाठले व त्याला निर्वस्त्र करुन अमानूष मारहाण केली. हा सर्व प्रकार महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी बघितलाही मात्र त्यांनी कार्तिकवर प्राथमिक उपचार करुन त्याला सोडून दिले. तसेच या घटनेची पोलिसांकडे तक्रार करु नये यासाठी शिक्षकांनी कार्तिकवर दबाव टाकल्याचा आरोपही कार्तिकच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून कार्तिकवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Web Title: The girl was disfigured by the debate over the Ganesh festival