शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला मिळेना महिला सुरक्षारक्षक नकारघंटा : अर्भक चोरी रोखण्यासाठी ७७ रक्षकांची आवश्यकता

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

नाशिक : महापालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह आणि नवजात शिशुवार्डांमध्ये अर्भक चोरी होण्याच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी व अर्भकांच्या सुरक्षिततेकरिता ७७ महिला सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. सदर महिला सुरक्षारक्षकांची मागणी महापालिकेने सुरक्षा मंडळ, होमगार्ड विभाग आणि नाशिक जिल्हा सैनिकी मंडळाकडे करूनही नकारघंटाच कानावर आल्याने पालिका प्रशासनाने अखेर ई-निविदा पद्धतीने महिला सुरक्षारक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शुक्रवारी (दि.१७) होणार्‍या महासभेत ठेवला जाणार आहे.

नाशिक : महापालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह आणि नवजात शिशुवार्डांमध्ये अर्भक चोरी होण्याच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी व अर्भकांच्या सुरक्षिततेकरिता ७७ महिला सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. सदर महिला सुरक्षारक्षकांची मागणी महापालिकेने सुरक्षा मंडळ, होमगार्ड विभाग आणि नाशिक जिल्हा सैनिकी मंडळाकडे करूनही नकारघंटाच कानावर आल्याने पालिका प्रशासनाने अखेर ई-निविदा पद्धतीने महिला सुरक्षारक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शुक्रवारी (दि.१७) होणार्‍या महासभेत ठेवला जाणार आहे.
राज्यात यापूर्वी ठिकठिकाणी अर्भक चोरीच्या घटना घडल्याने उच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महिला सुरक्षारक्षकांच्या नेमणुका करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षारक्षकांच्या नेमणुका या सुरक्षारक्षक मंडळामार्फतच करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह तसेच नवजात शिशुवार्डांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्यासाठी सुरक्षा मंडळाकडे ७७ महिला रक्षकांची मागणी नोंदविलेली होती. परंतु सुरक्षारक्षक मंडळाने सद्यस्थितीत महिला सुरक्षारक्षकच उपलब्ध नसल्याचे महापालिकेला कळविले आहे. महापालिकेने होमगार्ड विभागाकडेही महिला सुरक्षारक्षकांची मागणी नोंदवून पाहिली; परंतु होमगार्ड विभागानेही महिला होमगार्ड पुरविण्याबाबत असमर्थता दर्शविली. महापालिकेने पर्याय म्हणून नाशिक जिल्हा सैनिकी बोर्डालाही साकडे घालून पाहिले; परंतु त्यांच्याकडूनही नकारघंटाच ऐकायला मिळाली. महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात २४, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १४, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात १४, गंगापूर आणि सिन्नर फाटा, तसेच जिजामाता प्रसूतिगृह, पंचवटीतील मायको दवाखाना, सातपूर येथील मायको प्रसूतिगृह, दसक-पंचक येथील प्रसूतिगृह व उपनगर प्रसूतिगृह याठिकाणी प्रत्येकी ३, मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात ४ याप्रमाणे एकूण ७७ महिला सुरक्षारक्षकांची गरज भासणार आहे. सर्वत्र नकारघंटाच ऐकायला मिळाल्याने महापालिकेने अखेर ई-निविदा पद्धतीने महिला सुरक्षारक्षकांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर नेमणुका या तीन वर्षांच्या कालावधीकरिता राहणार असून, त्यासाठी महापालिकेला सुमारे सव्वा चार कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
इन्फो
६६ पुरुष सुरक्षारक्षकांच्या होणार नेमणुका
महापालिकेचे दवाखाने व प्रसूतिगृहांसाठी महिला सुरक्षारक्षकांबरोबरच ६३ पुरुष सुरक्षारक्षकांच्याही नेमणुका केल्या जाणार आहेत. पुरुष सुरक्षारक्षक हे महाराष्ट्र शासनाशी संबंधित सुरक्षा मंडळाकडे उपलब्ध असल्याने त्यांच्यामार्फतच नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेला तीन वर्षांकरिता ३ कोटी २१ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.