शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी 'तो' बनला 'ती'; लाँग ड्राईव्हवर असताना भलताच प्रकार घडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 15:46 IST

फोनवर मुलीच्या आवाजात बोलून त्यानं बहिणीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं. त्यानंतर दोघंही लाँग ड्राइव्हवर गेले आणि पुढे जे काही घडलं ते चक्रावून सोडणारं ठरलं.

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. एका भावानं त्याच्या बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी वेशांतर करुन महिलेचं रुप धारण केलं. त्यानंतर फोनवर मुलीच्या आवाजात बोलून त्यानं बहिणीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं. त्यानंतर दोघंही लाँग ड्राइव्हवर गेले. पण मद्यपान करुन दोघंही मद्यधुंद अवस्थेत रस्ताच चुकले. मग स्थानिक गावकऱ्यांनी दोघांना चोर समजून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण गोष्ट उघडकीस आली पोलिसांनीही दोघांसमोर कोपरापासून हात जोडले. 

असा झाला प्रकरणाचा खुलासासमोर आलेल्या माहितीनुसार भीलवाडा जिल्ह्यातील बडलियास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवाईपूर पोलीस चौकी क्षेत्राचा चावण्डिया गावात रात्री उशीरा पहारा देणाऱ्या गावकऱ्यांनी एका बाइकस्वाराला थांबवलं. बाइक चालवणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणीची गावकऱ्यांनी चौकशी केली. पण समाधानकारक उत्तरं काही त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. मग पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलं की बाइकस्वारासोबत असलेल्या व्यक्तीनं वेशांतर केलंय आणि तोही तरुणच आहे. वेशांतर केलेल्या तरुणानं बाईकस्वार तरुणाला धडा शिकवण्यासाठी वेशांतर करुन त्याला भेटायला बोलावलं होतं, असं पोलिसांना चौकशीतून लक्षात आलं. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकस्वार व्यक्तीचं नाव मिट्ठू लाल भील असं आहे. तो खेडी बेगू ठाण्याच्या हद्दीतील चित्तौडगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर स्त्री वेशांतर केलेल्या व्यक्तीचं नाव सोनू भील असून तो सिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी सोनू याला वेशांतर करण्याचं कारण विचारलं असता त्यानं मिट्ठू लाल आपल्या बहिणीला सारखं फोन करुन त्रास देत होता. त्यामुळे बहिणीच्या फोनवरुन फोन करुन त्याला भेटायला बोलावलं. त्यानंतर वेशांतर करुन मी त्याला भेटायचं ठरवलं आणि लाँग ड्राइव्हवर जायचं ठरलं. 

प्रवासात मुलीच्याच आवाजात साधत होता संवादसंपूर्ण प्रवासात मिट्ठू लालसोबत मुलीच्याच आवाजात संवाद साधत होतो, असं सोनूनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे मिट्ठूला देखील संशय आला नाही. दोघंही एका मंदिरात दर्शनाला देखील गेले होते. त्यानंतर माघारी परतात दोघांनी मद्यपान केलं. मद्यधुंद अवस्थेत दोघंही रस्ता चुकले आणि चावण्डिया गावात येऊन पोहोचले. त्याठिकाणी रात्री गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि चोर समजून पोलिसांच्या हवाली केलं. 

सोनू भीलचं भांड फुटलं तेव्हा पोलीसही हैराण झाले होते. त्यानं इतकं कमालीचं वेशांतर केलं होतं की कुणालाच काही संशय आला नाही. सोनूनं याआधीही काही कार्यक्रमांमध्ये वेशांतर करुन स्त्री पात्र साकारलं असल्याचंही पोलिसांना चौकशीत समोर आलं आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी