विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म

By Admin | Updated: December 2, 2015 03:55 IST2015-12-02T03:55:26+5:302015-12-02T03:55:26+5:30

येथील माधापूर भागातील शाळेत नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी

The girl gave birth to school | विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म

विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म


हैदराबाद : येथील माधापूर भागातील शाळेत नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
मंगळवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. माधापूर भागातील सरकारी शाळेत वर्ग सुरूअसताना पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. पोट दुखत असल्याचे सांगून ती शौचालयात गेली. यानंतर काहीच क्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मुलीने बाळाला जन्म दिलेला पाहून सगळेच अवाक् झाले.
माधापूरच्या पोलीस निरीक्षक नरसिमुलू यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर धानू नामक व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानू हा पीडित मुलीच्या शेजारी राहतो. पीडित मुलीचे वडील मजुरी करतात आणि जवळच्याच आदिवासी वस्तीत राहतात. मुलीच्या पालकांना ती गर्भवती असल्याची माहिती होती, हेही चौकशीतून समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The girl gave birth to school