मुलीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: August 23, 2014 01:59 IST2014-08-23T01:59:05+5:302014-08-23T01:59:05+5:30
पिपालजोहा जंगलात एका भाजपा नेत्याच्या मुलासह सहा जणांनी एका 18 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे.

मुलीवर सामूहिक बलात्कार
बारवाह (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील पिपालजोहा जंगलात एका भाजपा नेत्याच्या मुलासह सहा जणांनी एका 18 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे.
ही घटना गुरुवारी भागवानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपाचे माजी आमदार दलसिंग सोलंकी यांचा मुलगा नांगुडा ऊर्फ संतोष, अक्का, नानू, थाविरीया, बिला आणि कालरिया ही अटकेतील आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी बाडय़ा या गावची आहे. पीडित मुलाला एक्काने लगAाचे आमिष दाखवून जंगलात बोलावले आणि त्यानंतर आपल्या पाच सहकार्यासह बलात्कार केला. त्यांनी तिला या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.