शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:34 IST

पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील खुजनेर शहरात नायट्रोजन धुराचा वापर करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भयंकर घटनेनंतर कुटुंब आणि स्थानिक लोक अशा धोकादायक इव्हेंटवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ६ मे रोजी ही घटना घडली.

लग्न समारंभात नवरा-नवरीच्या एन्ट्रीसाठी नायट्रोजन धुराच्या पदार्थाने भरलेलं एक भांडं इव्हेंट मॅनेजरने ठेवलं होतं, जेणेकरून धुरामध्ये फोटो सेशन करता येईल. याच दरम्यान लग्नासाठी आलेली बाढगावची वाहिनी गुप्ता त्या भांड्यात पडली आणि ८० टक्के भाजली. तिला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

वाहिनीचे वडील राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही कुटुंबासह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. तिथे केमिकलने भरलेलं एक भांडं होतं. वाहिनी खेळत असताना अचानक त्यात पडली. प्राथमिक उपचारानंतर आम्ही तिला इंदूरला नेलं, पण तिला वाचवता आलं नाही." नायट्रोजनसारख्या धोकादायक केमिकल्सचा वापर थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने वाहिनीचे नेत्रदान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या दुःखद घटनेने स्थानिक लोकांना धक्का बसला आहे. लग्न समारंभात कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय नायट्रोजनसारखं धोकादायक केमिकल कसं वापरलं जातं? आणि प्रशासन याकडे का लक्ष देत नाही? असे प्रश्न आता लोक विचारत आहेत.

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश