शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

VIDEO: ऑपरेशन टेबलवर तरुणी पठण करत होती हनुमान चालिसा; डॉक्टरांनी केली यशस्वी ब्रेन सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 6:56 PM

तरुणी हनुमान चालिसा पठण करत असताना डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

नवी दिल्ली: दिल्लीतल्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील न्युरो सर्जरी विभागात एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेला पूर्णपणे बेशुद्ध न करता ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरी करताना महिला हनुमान चालिसा पठण करत होती.

मेंदूवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया अतिशय जटिल मानली जाते. डॉक्टर आणि रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. रुग्णाला कोणताही त्रा होऊ नये, शस्त्रक्रिया केव्हा झाली ते त्याला कळूही नये यासाठी डॉक्टर सतर्क असतात. मात्र दिल्ली एम्समधील न्युरो एनेस्थेटिक टीमनं रुग्णाला बेशुद्ध न करताच त्याच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना महिला पूर्णपणे शुद्धीत होती. इतकंच नव्हे, तर ती ऑपरेशन टेबलवर हनुमान चालीसा पठण करत होती. गुरुवारी एम्समध्ये दोन क्रेनियोटॉमी करण्यात आल्या. त्यातील एक २४ वर्षीय शिक्षिकेवर झाली. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून मोठा ट्युमर काढण्यात आला. डॉक्टर ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते, त्यावेळी शिक्षिका हनुमान चालिसा पठण करत होती. त्यावेळी ऑपरेशन थिएटरमधील एका व्यक्तीनं शिक्षिकेचा व्हिडीओ चित्रित केला.

शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेची स्थिती अतिशय सर्वसामान्य होती. ती हसत हसत ऑपरेशन थिएटरबाहेर पडली. भूलतज्ज्ञ आणि सहाय्यक उपकरणांमुळे डॉक्टरांचं काम काही प्रमाणात सोपं झालं आहे. २००२ पासून न्युरो सर्जरी विभागात क्रेनियोटॉमी (पूर्ण बेशुद्ध न करता केली जाणारी शस्त्रक्रिया) करण्यात येत आहे.