शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Video: विद्यार्थिनीच्या प्रश्नानं राकेश टिकैतांची भंबेरी; 'नहीं-नहीं' म्हणत तिच्याकडून माईकच काढून घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 17:10 IST

येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने माईक घेऊन टिकैतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न असे होते, की खुद्द राकेश टिकैतांचीही भंबेरी उडाली... (Farmer leader rakesh tikait)

नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 100 दिवस झाले आहेत. दिल्ली शिवाय देशाच्या इतर भागांतही छोठ्या-मोठ्या स्वरुपात आंदोलनं सुरू आहे. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी विविध राज्यांत जाऊन सभादेखील घेत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावरून अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. याची एक झलक शुक्रवारी झज्जर जिल्ह्यातील ढांसा बॉर्डरवर बघायला मिळाली. (Girl came on stage and asked tough questions to Farmer leader rakesh tikait video goes viral on social media)

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

व्हिडिओ व्हायरल -येथे शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले होते. याच वेळी एक विद्यार्थिनी व्यासपीठावर पोहोचली आणि तिने माईक घेऊन टिकैतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न असे होते, की ज्यांची उत्तर कदाचित राकेश टिकैतांकडेही नव्हती. या विद्यार्थिनीने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर व्यासपीठावर गोंधळ उडाला. यानंतर, लगेचच तिच्या हातून माईक हिसकावण्यात आला आणि तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. 

या विद्यार्थिनीने विचारलेल्या या प्रश्नांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी शेअरही केला आहे.

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

काय म्हणाली विद्यार्थिनी -या व्हिडिओतील पॅन्ट-शर्ट परिधान केलेली तरुण मुलगी म्हणेत, 'राकेश टिकैतांना काही प्रश्न विचारण्याची माझी इच्छा आहे, की ते उत्तर मिळावे, त्या समस्येचा तोडगा मिळावा, ते असे मिळावे, की देशातील तरुणालाही त्रास होऊ नये आणि शेतकऱ्यालाही त्रास होऊ नये. आपण म्हणालात, की चार-पाच पोळ्या करून आणा, जेनेकरून एकी रहावी आणि अशात आपले आंदोलनही सुरू राहील. ही आपली चांगली गोष्ट आहे. आपण म्हणालात, की आमचे आंदोलन सुरूच राहील, जोवर सरकार ऐकत नाही, तोवर आम्ही आडून राहू. पण, एक टक्का अथवा 0.005 टक्के जरी गृहित धरले, की सरकारही मागे हटले आणि आणि आपणही हटला नाहीत, तर त्या गोष्टीचा शेवट कुठे होणार आणि यामुळे आपल्या सममाजावर, आपल्या सलोख्यावर.... जसे की 26 जानेवारीची घटना झाली. ज्यात तुमच्या लोकांचा हात होता की नव्हता हे आम्हाला माहित नाही.'

राकेश टिकैत यांचे आवाहन; पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी पीकावरून फिरवला ट्रॅक्टर

विद्यार्थिनीला व्यासपीठावरून उतरवलं -एवढे बोलल्यानंतर व्यासपीठावर गोंधळ उडाला. स्वतः राकैश टिकैत यांचीही भंबेरी उडाली आणि लगेचच विद्यार्थिनीच्या हातून माईक हिसकावण्यात आला. यावर ती विद्यार्थिनी म्हणते, 'तुम्ही लोक तर असे चुकीचे करत आहात ना, देशातील तरुण तर प्रश्न विचारणारच.' यानंतर व्यासपीठावरील लोक आणखीणच संतापले आणि त्या तरुणीला नाव विचारू लागले. यावर या तरुणीनेही न डगमगता आपले नाव सांगितले. यानंतर तेथे उपस्थित असलेले लोक ती विद्यार्थी नेता असल्याचे म्हणू लागले. यावरही कोणती विद्यार्थी संघटना? असा सवालही त्या विद्यार्थिनीनं केला. व्हिडियोमद्ये स्पष्टपणे देसत आहे, की यानंतर एक महिला व्यासपीठावर येते आणि विद्यार्थिनीला व्यासपीठावरून खाली उतरण्यास सांगते.

Edited By: श्रीकृष्ण अंकुश 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती