महिलेला बेल्टने मारहाण; पाच पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 04:32 IST2019-05-29T04:32:53+5:302019-05-29T04:32:56+5:30

एका महिलेला बेल्टने मारहाण केल्याप्रकरणी दोन हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे,

Girl assaulted by belt; Action on five policemen | महिलेला बेल्टने मारहाण; पाच पोलिसांवर कारवाई

महिलेला बेल्टने मारहाण; पाच पोलिसांवर कारवाई

फरीदाबाद : एका महिलेला बेल्टने मारहाण केल्याप्रकरणी दोन हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे, तर तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महिलेला मारहाण करुन अपमानित केल्याप्रकरणी या पोलिसांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
चार मिनिटांच्या व्हिडिओत एक अधिकारी या महिलेला बेल्टने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ज्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे त्या प्रकरणात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे ही महिला सांगत आहे. पण, पोलिसांनी तिचे काही न ऐकता तिला मारहाण केली. हा व्हिडिओ मागील वर्षीच्या आॅक्टोबरमधील आहे. आदर्शनगर पोलीस स्टेशनच्या टीमला अशी माहिती मिळाली होती की, एक दाम्पत्य अवैध कामे करत आहे. पोलिसांनी छापा टाकून महिलेला अटक केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Girl assaulted by belt; Action on five policemen