शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसला पीएम मोदींची हत्या करायची आहे', केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:22 IST

Parliament Budget Session: 'काँग्रेस नेते आधी मोदींना शिव्या द्यायचे, आता त्यांचा खात्मा करण्याची भाषा वापरत आहेत.'

Giriraj Singh On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. त्यावरुन मोठा वादही झाला होता. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. 'काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचे आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे. 

माध्यमांशी बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, 'नरेंद्र मोदींना शिव्या देण्यासाठी अदानी फक्त बहाणा आहे. दहा वर्षे त्यांचे सरकार वादात अडकले होते. गेल्या 10 वर्षांपासून देशाला मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता हे लोक म्हणत आहेत की, मोदींचा खात्मा झाला तरच हे सरकार संपेल. हे लोक आधी शिव्या द्यायचे, मोदींना मृत्यूचा व्यापारी म्हणायचे, आता मारण्याची तयारी करत आहेत.'

PM मोदींच्या सुरक्षेवरुन पंजाब सरकारने १ वर्षानंतर घेतली अ‍ॅक्शन!; ८ IPS आणि १ IAS अधिकाऱ्यांवर करणार कारवाई

गिरिराज सिंह पुढे म्हणतात, 'पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले होते. त्यावेळेस त्यांना उड्डाणपुलावर थांबवण्यात आले आणि मारण्याची सर्व तयारी केली होती. आता काँग्रेस त्यांच्या मृत्यूवर चर्चा करत आहे. त्यांचे नेते आता थेट पंतप्रधानांचा खात्मा करण्याची भाषा वापरत आहेत.'

राहुल गांधींवर भारताचा अपमान केल्याचा आरोपसोमवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 'राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर जाऊन भारताचा, भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संसदेचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,' असं ते म्हणाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस