‘गिरिराज सिंह बलात्काऱ्यापेक्षा कमी नाहीत’
By Admin | Updated: April 3, 2015 23:44 IST2015-04-03T23:35:51+5:302015-04-03T23:44:40+5:30
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यामुळे निर्माण झालेले वादळ अ

‘गिरिराज सिंह बलात्काऱ्यापेक्षा कमी नाहीत’
नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यामुळे निर्माण झालेले वादळ अद्याप शमलेले नाही. देशात गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडावरील माहितीपटामुळे वादग्रस्त ठरलेल्या ब्रिटिश चित्रपट निर्मात्या लेस्ली उडविन यांनी आता या वादात उडी घेतली आहे.
महिलांविरुद्ध वक्तव्य करणारे गिरिराज सिंग हे एखाद्या बलात्कारी व्यक्तीपेक्षा कमी नाहीत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे, तसेच गिरिराज सिंग यांच्यासारख्या मंत्र्यांची पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. माझ्या माहितीपटाने बलात्कारींना अभय मिळाले अशी आगपाखड करणारे जेव्हा अविचाराने अशी वक्तव्ये करतात तेव्हा मन अस्वस्थ होते. स्त्रियांबद्दल अशी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या राजकारण्यांना भारतीय संसदेत स्थान का दिले जाते? असा सवाल लेस्ली यांनी गुरुवारी एका मुलाखतीत बोलताना केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)