शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! नातेवाईकांनी नकार देताच आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा, केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:33 IST

नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा तर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले. 

चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर मुलींनी स्वतःला सावरलं पण त्यासोबतच आईच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधीही पार पाडले. सध्या या मुलींची सर्वत्र चर्चा रंगली आहे. झारखंडच्या गिरिडीहच्या सरौनमध्ये जमिनीच्या वादात नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा तर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले. 

मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजकुंडा पंचायतीच्या सरौनमध्ये दुखन पंडित यांची पत्नी सांझो देवी यांचा मृत्यू झाला. सांझो देवीच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मुलींसह घरी आल्या. सांझो देवीला चार मुली होत्या, मुलगा नाही. मुलींचे लग्न झाल्यावर आणि मुलगा नसल्यामुळे जमिनीवरून वाद झाला. 

सांझो यांच्या निधनानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. दुखन पंडित यांना तीन भाऊ होते. दुखन पंडित यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. दुखन पंडित यांच्या पत्नी सांझो देवी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यूची माहिती मिळताच चार मुली आल्या. 

दुखन पंडित यांचा मोठा भाऊ व मधला भाऊ याने जमिनीच्या वादामुळे पार्थिव उचलण्यास नकार दिला. त्यानंतर दुखन पंडितच्या चार मुलींनी आईला खांदा दिला आणि स्मशानभूमीत नेले. त्यानंतरही नातेवाईकांनी वाद घातला आणि मारामारी केली. पण दुखन पंडित यांच्या चार मुलींनी उपस्थित राहून अंत्यसंस्कार केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"