शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' हवी, पण काही लोकांना वाटतं...; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबावर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:25 IST

"ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार."

 नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेला दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून (Congress) होणारे नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पलायन, अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे जुने अथवा वरिष्ठ नेते चितीत दिसत आहेत. काँग्रेसची ही घसरण पाहता, पक्षातील वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal), यांनी नेतृत्व बदलासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 मधील नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे, असे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधी यांना उघडपणे पद सोडण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले, पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. 8 वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

मला सर्वांची काँग्रेस हवी आहे, कुणाच्या घरची काँग्रेस नाको -सिब्बल म्हणाले, काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ते म्हणाले, ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार.

सिब्बल म्हणाले, ‘सर्वांची काँग्रेस म्हणजे, केवळ सोबत असणेच नाही, तर भारतातील ज्या लोकांना भाजप नको आहे, अशा सर्व लोकांना एकत्रित आणणे आहे. याशिवाय, ‘ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, हे सर्व जन काँग्रेसचेच होते. मात्र, सर्व जण दूर गेले आहेत. या सर्वांना एकत्रित आणायचे आहे,’ असेही सिब्बल म्हणाले.

कपिल सिब्बल म्हणाले, "दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कुण्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्विकारावे लागेल," असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी