शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

निवडणूक न होऊ देणारे आज लोकशाहीचे धडे देऊ पाहातायत; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

By मोरेश्वर येरम | Published: December 26, 2020 4:44 PM

"पदुच्चेरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होऊ न देणारे आज दिल्लीत बसून आम्हाला लोकशाहीचे धडे देऊ पाहत आहेत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

ठळक मुद्दे'आयुष्मान भारत' योजनेबाबत काय म्हणाले मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिलं जशास तसं उत्तरपदुच्चेरीमध्ये निवडणुका होऊ देत नसल्याचा मोदींचा काँग्रेसवर आरोप

नवी दिल्लीदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पदुच्चेरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होऊ न देणारे आज दिल्लीत बसून आम्हाला लोकशाहीचे धडे देऊ पाहत आहेत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पदुच्चेरीमध्ये पंचायत आणि पालिका निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही काँग्रेसशासित पदुच्चेरीमध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. "सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही पदुच्चेरीमध्ये सत्तेत असलेले लोक पंचायत आणि पालिका निवडणुका होऊ देत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांमुळे लोकशाही बळकटी मिळाली आहे. जम्म-काश्मीरच्या जनतेने विकासाची कास धरत घराबाहेर पडून मतदान केलं. इतके वर्ष सत्तेत असूनही सीमेवरील भागात विकास न करणं ही खूप मोठी चूक काँग्रेसनं केली आहे", असं मोदी म्हणाले. 

'आयुष्मान भारत' योजनेबाबत काय म्हणाले मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी 'आयुष्मान भारत' योजनेची सुरुवात केली. जम्मू-काश्मीरमधील जनतेला या योजनेतून होणाऱ्या फायद्यांबाबत मोदींनी भाष्य केलं. 

"आयुष्मान भारत योजनेतून जम्मू-काश्मीरमधील जनतेला फक्त जम्मू-काश्मीरमधीलच नव्हे, तर देशातील असंख्य रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला देशातील हजारो रुग्णालयांना जोडण्यात आलं आहे. त्यातील कोणत्याही रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे", असं मोदी म्हणाले. 

"गेल्या दोन वर्षात दीड कोटीपेक्षा अधिक गरीब नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनाही कठीण काळात या योजनेचा फायदा झाला आहे. येथील १ लाख लोकांना आजवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता आले आहेत", असंही मोदी पुढे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस