शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...तर आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्यास 'हे' सरकार उपचारांचा खर्च देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 8:06 AM

CoronaVirus : कोणत्याही अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे बलबीरसिंग सिद्धू यांनी सांगितले.

चंदीगड : कोरोनाची लस घ्या, अन्यथा कोरोनाचा संसर्ग झाल्यास राज्य सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही, असे पंजाब सरकारने हेल्थ वर्कर्स आणि फ्रंट लाइन वर्कर्संना स्पष्टपणे सांगितले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी लसीचा पहिला डोस घेण्याचा कालावधी वाढवला आहे. आधी19 फेब्रुवारीपर्यंत हा कालावधी होता. मात्र, आता यामध्ये 25 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (get strict vaccinated by the punjab government otherwise pay for your treatment)

या लसीकरण मोहिमेत जर कोणी लस घेतली नाही आणि यानंतर एखाद्यास कोरोना संसर्ग झाल्यास, त्याला स्वत:च उपचारांसाठी खर्च करावा लागणार आहे. आतापर्यंत सरकारकडून कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांचा खर्च करण्यात येत होता. अत्यंत कमी प्रमाणात लोक लस घेत आहेत, असे सांगण्यात आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, देशातील काही राज्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याचेही वृत्त आहे. 

ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस देण्यात आली नाही, त्यांच्यासाठी पुन्हा लस देण्याची संधी देण्यात आली आहे. जर, यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्यास, त्यांच्या उपचाराचा खर्च त्यांनाच करावा लागणार आहे. तसेच, त्यांना क्वारंटाइन आणि आयसोलेशनची रजा घेण्यासाठी सुद्धआ परवानगी दिली जाणार नाही, असे पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीरसिंग सिद्धू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या २० फेब्रुवारीच्या अहवालानुसार पंजाबमध्ये कोरोनाचे ३००० रुग्ण सक्रिय आहेत. तर तीन आठवड्यांपूर्वी राज्यात फक्त २००० कोरोनाचे रुग्ण सक्रिय होते. तसेच, कोणत्याही अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे बलबीरसिंग सिद्धू यांनी सांगितले.

याचबरोबर, कोरोनाची प्रकरणे वाढत असलेल्या सहा राज्यात पंजाबचा समावेश आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. वाढती संख्या लक्षात घेता अद्यात कोरोना संपला नाही, असे सूचित करते. पंजाबमध्ये कोरोना संसर्गाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे गरजेचे आहे, असेही बलबीरसिंग सिद्धू  यांनी सांगितले.

रविवारी १४२६४ नवे रुग्ण, मृत्यूदरात घटदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशीही वाढ झाली असून रविवारी १४२६४ नवे रुग्ण आढळले व ९० जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले  आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPunjabपंजाब