माझ्यावर राग काढा, मुलावर नको - विजय मल्ल्या

By Admin | Updated: March 30, 2016 09:59 IST2016-03-30T09:39:57+5:302016-03-30T09:59:57+5:30

शिव्या द्यायच्या आहेत त्या मला द्या. माझ्या मुलाला नको. त्याला लक्ष्य करु नका असे ट्विट विजय मल्ल्यांनी केले आहे.

Get rid of anger on me, not son - Vijay Mallya | माझ्यावर राग काढा, मुलावर नको - विजय मल्ल्या

माझ्यावर राग काढा, मुलावर नको - विजय मल्ल्या

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. ३० - तुम्हाला जे काय बोलायचेय, तुमचा राग काढायचाय, शिव्या द्यायच्या आहेत त्या मला द्या. माझ्या मुलाला नको. माझ्या मुलाचा सिद्धार्थचा माझ्या कुठल्याही व्यवसायाशी संबंध नाही. त्यामुळे त्याला लक्ष्य करु नका असे ट्विट विजय मल्ल्या यांनी परदेशातून केले आहे. 
 
विजय मल्ल्या यांच्यावर सध्या प्रसारमाध्यमांमधून जोरदार टीका सुरु आहे. विजय मल्ल्या यांच्यावर बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेल्याचा आरोप आहे. त्यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी हे कर्ज घेतले होते. मल्ल्यांची भारतातील मालमत्ता विकून हे पैसे वसूल करण्यासाठी बँकांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रविवारी आसामच्या रंगापाडामध्ये सभेमध्ये बोलताना मल्ल्याकडून सर्व देणी वसूल करु, त्याला सोडणार नाही असे म्हटले होते. परदेशात असलेल्या मल्ल्यांनी आपण कायद्यापासून पळत नसल्याचा दावा केला आहे. आपल्याला नियमानुसार कर्ज मिळाले, बँकांनी सर्व बाबींची छाननी केल्यानंतर मला कर्ज दिले असा त्यांचा दावा आहे. 

Web Title: Get rid of anger on me, not son - Vijay Mallya