चंद्रशेखर बर्वे -नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिचे आयएसआयचा अधिकारी अली हसन याच्यासोबतचे चॅटिंग आणि तिच्या डायरीतील काही नोंदी उघडकीस आल्या आहेत. तिच्या चार बँक खात्यांमध्ये कुठून पैसे जमा झाले, याचा शोधही गुप्तचर संस्थांकडून घेतला जात आहे.
ज्योतीने तिच्या २०१२ च्या डायरीत म्हटले आहे, ‘पाकिस्तानच्या १० दिवसांच्या प्रवासानंतर आज मी मायदेशी भारतात परत आली आहे. या प्रवासात पाकिस्तानी लोकांचे मला भरपूर प्रेम मिळाले. दोन्ही देशांच्या सीमा कधीपर्यंत राहतील माहीत नाही. मनात जे दु:ख आहे, ते संपायला हवे.’
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या काळात ज्योती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात तैनात एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती.
चॅटिंगमध्ये काय आढळले? अली हसन : तू नेहमी आनंदी राहावी. नेहमी हसत-खेळत राहावी. कोणतेही दु:ख तुझ्या वाटेला कधीही येऊ नये, अशी मनापासून मी प्रार्थना करतो.ज्योती मल्होत्रा : स्मितहास्य करणारा इमोजी पाठवीत, माझे लग्न पाकिस्तानात करून द्या.