शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

लवकरच पेट्रोल पंपावर मिळणार जेनरिक औषधे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:49 AM

केंद्र सरकारची देशभरातील पेट्रोल पंपांवर जेनरिक औषधांची दुकाने सुरु करण्याची योजना आहे. 'जन औषधी' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देणे हा योजनेमागे उद्देश असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.केंद्र सरकारची देशभरातील पेट्रोल पंपांवर जेनरिक औषधांची दुकाने सुरु करण्याची योजना आहे

नवी दिल्ली, दि. 17 - केंद्र सरकारची देशभरातील पेट्रोल पंपांवर जेनरिक औषधांची दुकाने सुरु करण्याची योजना आहे. 'जन औषधी' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. जनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देणे हा योजनेमागे उद्देश असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. नजीक भविष्यात रसायन आणि खत मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या औषधनिर्माणशास्त्र विभागातंर्गत जेनरिक औषधांची दुकाने सुरु होतील अशी माहिती प्रधान यांनी दिली. 

बुधवारी पेट्रोल पंप मालक आणि एनर्जी एफिशंसी सर्विसेज लिमिटेडमध्ये पेट्रोल पंपावर विविध ऊर्जा उपकरणे आणि एलईडी ब्लब विक्रीचा करार झाल्यानंतर ते बोलत होते. ही योजना लागू करण्यामध्ये लायक औषध विक्रेत्यांची कमतरता ही मुख्य समस्या आहे. कायद्यानुसार अशा दुकानांमध्ये काम करणा-यांकडे औषधशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे. सरकारी उपक्रम असल्याने त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे त्यांनी सांगितले. अधिकारी लवकरच यातून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेतून रोजगाराच्याही संधी निर्माण होणार आहेत. 

आणखी वाचारस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथराजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स

वर्षभरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशभरात ३ हजार जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यात शासनातर्फे जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येतील, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले होते.  आज औषधांच्या अवाढव्य किमती आणि उपचारांच्या न परवडणाऱ्या खर्चामुळे सामान्य माणूस डॉक्टरांकडे जाण्यास धजावत नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे कितीतरी रुग्ण आहेत, जे डॉक्टरांकडे गेले असते तर वाचले असते. म्हणून जेनरिक औषधे जास्तीतजास्त बाजारात येणे आवश्यक आहे. यासाठी जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे बापट यांनी म्हटले होते.  

डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागच्यावर्षी घेतला.  किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारार्थ लागणाऱ्या १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करांतून मुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला.