जनरलच्या तिकीटावर त्याच पैशांत स्लीपरमधून प्रवास करता येणार; रेल्वेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:04 IST2023-01-10T16:03:39+5:302023-01-10T16:04:09+5:30
सामान्य तिकिटाने प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जनरलच्या तिकीटावर त्याच पैशांत स्लीपरमधून प्रवास करता येणार; रेल्वेचा निर्णय
Indian Railways Latest News: रेल्वेने प्रवास करणारे असाल आणि तिकीट बुक नसेल तर एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही जनरल तिकिटमध्ये स्लीपर कोचमधून प्रवास करू शकणार आहात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही.
देशभरात कडाक्याची थंडी पाहता भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. जनरल तिकीट घेणारे प्रवासीही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा निर्णय काही ठराविक काळासाठीच असेल. त्यामुळे जवनरलचे तिकीट काढलेल्या लोकांना सुरक्षित प्रवास करणे सोपे होणार आहे.
ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतात, त्या ट्रेनची माहिती मागविण्यात आली आहे. प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे त्या सर्व स्लीपर कोचचे रूपांतर जनरलमध्ये करण्याचा विचार करत आहे. हिवाळ्याच्या मोसमात अनेक प्रवासी स्लीपर कोचऐवजी एसी कोचने प्रवास करणे पसंत करत आहेत, त्यामुळे स्लीपर कोचमध्ये प्रवासी कमी आहेत. यामुळे रेल्वेने एसी कोच वाढविण्यास सुरुवात केली आहे.
हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोचमधील 80 टक्के सीट रिकाम्या असतात. सामान्य तिकिटाने प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.